मुंबई: ‘मराठी नाही तर नाही’ असे ठणकावत अॅमेझॉनवर भाषेचा अंतर्भाव करण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी या मागणीवरून मनसैनिकांनी पुणे आणि मुंबईत अॅमेझॉनचं कार्यालय व वेअरहाऊसवर धडक देत तोडफोड केली. त्यामुळे अॅमेझॉनने हा विषय अधिक न वाढवता मनसेची मागणी मान्य करण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अॅमेझॉनची वेबसाइट व मोबाइल अॅपवर येत्या सात दिवसांत मराठी झळकणार असून तसे आश्वासन अॅमेझॉनने दिल्याचे नेते सांगत आहेत. दरम्यान, अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष यांचीही माफी मागायला हवी, अशी भूमिका मनसेने घेतली असून आज मनसे नेते आणि अॅमेझॉन व्यवस्थापनातील अधिकारी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा होणार असल्याचे कळते. ( )

वाचा:

मराठीवरून मनसे आणि अॅमेझॉन कंपनी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अॅमेझॉनवर इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेलाही स्थान असायला हवे, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यातूनच ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’, असे फलक मुंबईत सर्वत्र लावत मनसेने जोरदार मोहीमही उघडली आहे. दुसरीकडे अॅमेझॉनच्या अनेक फलकांनाही मनसेने लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने मनसे विरुद्ध मुंबईतील दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. अॅमेझॉनच्या याचिकेवरून न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अॅमेझॉनच्या कामात मनसेने कोणताही अडथळा आणू नये. मनसेवर अॅमेझॉनने जे आरोप केले आहेत त्यावर १३ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राज यांनी ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे, असेही नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी या नोटिसा बजावण्यात आल्या असताना शुक्रवारी त्याचे पडसाद पाहायला मिळाले.

वाचा:

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कोंढवा येथील अॅमेझॉनचं कार्यालय फोडलं तसेच मुंबईत चांदिवली येथील अॅमेझॉनच्या वेअरहाऊसलाही लक्ष्य करण्यात आलं. मनसेचा हा आक्रमक पवित्रा पाहून अॅमेझॉनने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, यांना अॅमेझॉनकडून ई-मेल आला आहे. त्यात अॅमेझॉनवर येत्या सात दिवसांत मराठीला स्थान देण्याची तयारी दर्शवताना ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ ही मोहीम स्थगित करण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत अखिल चित्रे यांनी माध्यमांना माहिती दिली. आम्हाला आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी, असे आम्ही अॅमेझॉनला सांगितले असून राज ठाकरे यांचीही त्यांनी माफी मागायला हवी, अशी आमची मागणी असल्याचे चित्रे म्हणाले.

दरम्यान, अॅमेझॉनचे अधिकारी व मनसे नेते यांच्यात आज चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले असून हे अधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर जाणार का, याबाबत मात्र काही माहिती मिळू शकली नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here