म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सध्या राज्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे राज्यातील जनता, नोकरदार वर्ग, छोटे मोठे व्यापारी यांची आर्थिक गणिते बिघडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ठोस उपाययोजना न करता लागू करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे मत मनसे नेते यांनी शुक्रवारी व्यक्त केले. आर्थिक समस्या उद्भवल्यामुळे हे सरकार स्वत: तर भिकारी आहेच आणि आता जनतेलाही भिकारी बनवण्याचे चाळे या सरकारकडून सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री यांच्या महाविकास आघाडी सरकारवर केली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. सरकारकडून जनतेला कोणतेही आर्थिक सहाय्य दिले जात नाही. उलट माफ केलेले कर पुन्हा वसूल केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळेचे शुल्क भरायचे आहे. वीजबिलाच्या दरात वाढ करून ठेवली आहे. सरकार म्हणून तुम्ही जनतेला काहीच दिलासा देत नाही. अमेरिकेप्रमाणे हे सरकार आर्थिक पॅकेज महाराष्ट्रातील जनतेसाठी जाहीर करत नाहीच, पण याउलट संचारबंदी करून लोकांना त्यांच्या उपजीविकेसाठी कामही करू दिले जात नाहीये. अशा परिस्थितीत जनतेने पैसे आणयचे कुठून असा सवालही देशपांडे यांनी ठाकरे सरकारला केला.

सेलिब्रिटीच्या नाइट पार्टी असोत, वा रेसकोर्सवर होणाऱ्या पार्ट्या असोत, त्यांना सारेकाही माफ आणि नियम केवळ जनतेसाठी, अशी या सरकारची भूमिका आहे. करोनासंदर्भातील दुसरा म्युटेड व्हायरस ब्रिटनमध्ये सापडला म्हणून संचारबंदी केली. असेच भविष्यात तिसरे चौथे व्हायरस सापडू शकतील म्हणून काय जनतेला कायम लॉकडाउनमध्ये ठेवणार का, असा सवालही त्यांनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here