तिरुअनंतपुरम : केरळच्या तिरुअनंतपुरमची रहिवासी असलेल्या २१ वर्षांच्या या तरुणीनं देशात एक नवा इतिहास रचलाय. अवघ्या २१ व्या वर्षी महापौरपदी निवड होणारी आर्या राजेंद्रन ही देशातील पहिली तरुणी ठरलीय.

आर्या राजेंद्रन सध्या बीएससी गणिताची विद्यार्थिनी आहे. तिरुअनंतरपुरम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिनं पहिल्यांदाच मतदान केलं होतं आणि ती उमेदवार म्हणूनही उभी राहिली होती. आता ती चक्क महापौरपदी विराजमान होणार आहे. ती केरळची आणि देशातील सर्वात बनून आर्या राजेंद्रन एक नवा इतिहास कायम करणार आहे.

आर्याचे वडील इलेक्ट्रिशियन तर आई एलआयसी एजंट म्हणून काम करतात. आर्या पक्षाच्या तिकीटावर मुडावनमुगल विभागातून निवडून आलीय. २१ डिसेंबर रोजी तिचा शपथविधीही पार पडला. आता, सीपीएमकडून आर्य राजेंद्रन हिची महापौरपदी निवड करण्यात आलीय.

पक्षाच्या जिल्हा समिती आणि राज्य समितीनंही आर्याला महापौरपदासाठी हिरवा कंदील दाखवलाय. यामुळे, अधिक सुशिक्षित महिला नेतृत्वासाठी समोर येतील, अशी आशा पक्षाकडून व्यक्त करण्यात येतेय.

‘महापौरपदाचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. मी त्याचं पालन करीन. निवडणुकीदरम्यान जनतेनं मला पसंती दिली कारण मी एक विद्यार्थी आहे आणि लोकांना एक शिक्षित व्यक्ती प्रतिनिधी म्हणून हवा होता. मी माझे शिक्षण सुरू ठेवतानाच महापौर म्हणून माझी कर्तव्यं पार पाडणार आहे’ असं आर्या राजेंद्रन हिने म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here