मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावरील बॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. , आणि मोहम्मद सिराज यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फक्त १९१ धावा करता आल्या. भारताकडून बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात १ बाद ३६ धावा केल्या. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल शून्यावर बाद झाला. भारत अद्याप १५९ धावांनी पिछाडीवर आहे.

वाचा-

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. जसप्रीत बुमराहने पाचव्या ओव्हरमध्ये बर्न्सला शून्यावर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर आर अश्विनने १३व्या षटकात मॅथ्यू वेडला बाद केले. त्याचा शानदार कॅच रविंद्र जडेजाने घेतला. वेड पाठोपाठ अश्विनने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. त्याने स्टीव्ह स्मिथला शून्यावर बाद केले. स्मिथ बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३८ होती.

वाचा-

स्मिथ गेल्यानंतर मार्नस लाबुशाने आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी जम बसवेल असे वाटत असताना उमेश यादवने हेडला ३८ धावांवर बाद केले. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने मार्नस लाबुशानेची विकेट घेत मोठा अडथळा दूर केला. लाबुशानने ४८ धावा केल्या. दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ५ बाद १३६ धावा केल्या होत्या.

वाचा-

पहिल्या दोन सत्रात भारताने बाजी मारली होती. तिसऱ्या सत्रात देखील गोलंदाजांनी पुन्हा कमाल केली. सिराजने कॅमरून ग्रीनला माघारी पाठवले. त्यानंतर अश्विनने कर्णधार टीम पेनला १३ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला. तळातील फलंदाजांमध्ये धोकादायक असलेल्या मिचेल स्टार्कला ७ वर बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था ८ बाद १६४ अशी केली. बुमराहने फटकेबाजी करून धावांची संख्या वाढवणाऱ्या नॅथन लायनची विकेट घेतली. रविंद्र जडेजाने पॅट कमिन्सची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्ठात आणला.

पाहा-

भारताकडून बुमराहने सर्वाधिक चार, अश्विनने ३, सिराजने २ तर जडेजाने एक विकेट घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here