वाचा:
पुण्यात शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत टोलेबाजी केली होती. विधानसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे विधान बरेच गाजले होते. त्याच धर्तीवर चंद्रकांत पाटील यांनी ‘मी परत जाईन’ असे विधान फडणीसांच्या उपस्थितीत केले. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या आगमनामुळे उमेदवारी गमवावी लागल्याने नाराज झालेल्या माजी आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती. तो धागा पकडत पाटील यांनी फटकेबाजी केली. पुण्यात प्रत्येकाला ‘सेटल’ व्हावे वाटते, पण माझ्या विरोधकांना सांगून टाका, मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे, असे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत म्हणाले. या फटकेबाजीचा अजित पवार यांनी आज खास पुणेरी स्टाइलमध्येच समाचार घेतला.
वाचा:
भाजपमधील एक नेता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन, असे म्हणत असताना आता दुसरे नेते मी परत जाईन परत जाईन, असे म्हणायला लागले आहेत असे नमूद करत परत कोल्हापूरला जायचेच होते तर तुम्ही पुण्यात आलेच कशाला, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये निवडणूक लढवून मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय केला आहे, असेही पवार म्हणाले. पुण्यात विधान भवन या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींशी पवार यांनी संवाद साधला. सरकार गेल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा तोल सुटला आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडताना त्यांना गार गार वाटत होतं. त्यामुळे आता आमच्या पक्षात आमदार येत असतील तर त्यांना वाईट वाटण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले.
वाचा:
करोनाचा धोका टळलेला नाही
करोनाचा धोका अजून टळलेला नाही. नव्या विषाणूमुळे धोका कायम आहे. संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले. करोनावरील लस प्रथम आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल फोर्स आणि पोलीस यांना देण्यात येणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times