पुणे: प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या बंद बंगल्यात घरफोडी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याला नागरिक व पोलिसांनी पकडले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या बंगल्यात चोरट्याला काहीही हाती लागले नसल्याचे समोर आले आहे. ( Update )

वाचा:

अजय मल्हारी खरात (वय २०, रा. एकता मित्र मंडळाजवळ, पद्मावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खेडकर यांचे नातू संजय विश्वनाथ ओव्हाळे (वय ५०, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील प्रेमनगर सोसायटीमध्ये सहा क्रमांकाचा बंगला तक्रादार यांचे आजोबा व प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांचा आहे. खेडकर यांचे निधन झाल्यानंतर त्या बंगल्यात कोणीच राहण्यास नाही. त्यामुळे खरात हेच अधून-मधून या बंगल्या जाऊन पाहणी करत असतात. या बंगल्याच्या तळमजल्यावर एक डॉक्टर भाड्याने राहतात. २४ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास भाडेकरू असलेल्या डॉक्टर महिलेचा खरात यांना फोन आला. वरच्या मजल्यावर कोणी तरी घुसले असून फोडण्याचा आवाज येत आहे. बहुतेक चोर शिरल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला. खरात यांनी तत्काळ आजोबांच्या बंगल्याकडे धाव घेतली. तसेच, घटनेची माहिती पोलिसांना दिली.

वाचा:

खरात हे काही वेळातच खेडकर यांच्या बंगल्याजवळ पोहचले. त्यावेळी दोन पोलीस घटनास्थळी पोहचले होते. तसेच, बंगल्या शेराजी राहणारे व नातेवाईक त्या ठिकाणी आले. त्यानंतर पोलीस व तक्रारदार यांनी व्यवस्थित पाहणी केली. त्यावेळी चोरटा हा गॅलरीची खिडकी उघडून आत घुसला असल्याचे आढळून आले. त्यानंतर घटनास्थळी आणखी पोलिस आले. त्यानंतर पोलीस हे बंगल्याच्या मुख्य दरवाजा व गॅलरीजवळ थांबले. काहीजण मध्ये गेले. त्यांनी एका तरुणाला पकडून आणले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ काहीही मौल्यवान ऐवज नसल्याचे आढळून आले. तक्रारदार यांनी देखील बंगल्यात जाऊन पाहणी केली. त्यावेळी घरातील वस्तू तशाच असल्याचे आढळून आले. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here