पुणे: ऐवजी पुण्यातील कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवणारे प्रदेशाध्यक्ष यांनी पुण्यात शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना ‘कोल्हापूरला मी परत जाईन’, असे विधान केले होते. चंद्रकांतदादांच्या या ‘परत जाईन’ची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर आपली सविस्तर भूमिका मांडली व सध्या मी येथेच राहीन असे स्पष्ट केले. ( Update )

वाचा:

‘मी कोल्हापूरला जाणार म्हणून कोणी हुरळून जाऊ नये वा दु:खीही होऊ नये. केंद्राने मला मिशन दिले आहे ते पूर्ण केल्यानंतरच मी कोल्हापूरला जाणार आहे. हा कालावधी दहा, वीस किंवा पंचवीस वर्षांचाही असू शकतो’, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सध्या तरी मी येथेच राहणार आहे, असे नमूद करताना प्रत्येकाला मूळ गाव बोलवत असतं. त्यामुळे आपल्या मूळ गावी सेटल व्हावं असं मला वाटण्यात गैर काय?, असा सवालही पाटील यांनी केला. कोथरुडमधून पुढची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पुढची निवडणूक खूप दूर आहे, असे म्हणत पाटील यांनी हा प्रश्न टोलवला.

वाचा:

यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची खिल्ली उडवली होती. भाजपमधील एक नेता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन, असे म्हणत असताना आता दुसरे नेते मी परत जाईन परत जाईन, असे म्हणायला लागले आहेत असे नमूद करत परत कोल्हापूरला जायचेच होते तर तुम्ही पुण्यात आलेच कशाला, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सावध उत्तर दिलं. यापूर्वी ते बोलत नव्हते आता ते बोलत आहेत. हा अॅक्शन-रिअॅक्शनचा खेळ आहे, असे पाटील म्हणाले. विरोधक असूनही जे चांगले आहे त्यास चांगलेच म्हटले पाहिजे, असेही पाटील यांनी पुढे नमूद केले.

वाचा:

पुणे महानगरपालिकेत २३ गावांचा समावेश करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, हे करून या गावांचा विकास होणार नाही. तेव्हा राजकीय स्वार्थापोटी असे निर्णय घेणं योग्य नाही, असे चंद्रकांत पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

दरम्यान, गृहराज्यमंत्री यांनी कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना कुठे पाठवायचे याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, असे सतेज पाटील म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here