जळगाव: येथील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मला नोटीस बजावली आहे. ही नोटीस मला आज मिळाली. बुधवारी (दि. ३०) मला मुंबईत चौकशीला बोलावण्यात आले आहे. चौकशीला मी सामोरा जाणार आहे. ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते यांनी आज जळगावात दिली. ( Latest Update )

वाचा:

एकनाथ खडसे हे आज सायंकाळी वैयक्तिक कामानिमित्त जळगावात आलेले होते. त्यांनी आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या नोटिशीबाबत स्पष्टीकरण देत संभ्रम दूर केला. आपल्याला आजच भोसरीतील भूखंड प्रकरणी ईडीची नोटीस मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खडसे पुढे म्हणाले की, भोसरी एमआयडीसीतील भूखंडाचा व्यवहार माझ्या पत्नीच्या नावाने झाला आहे. त्यात माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आता याच भूखंडाच्या संदर्भात मला ईडीने नोटीस बजावली आहे. याच प्रकरणाची यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, तसेच न्यायमूर्ती झोटिंग समितीकडून चारवेळा चौकशी झाली आहे. प्रत्येक वेळी आपण आवश्यक ती माहिती व कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार मला क्लीन चिट देखील मिळाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा या प्रकरणाची चौकशी होणार आहे. आताही मी चौकशीला सामोरा जाणार आहे. ईडीला पण आधीच्या यंत्रणांप्रमाणे सहकार्य करू, असे खडसेंनी सांगितले.

वाचा:

महाराष्ट्रातून सहानुभूती

एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना मोठे विधान केले आहे. ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला फोन येत आहेत. त्यातून लोकांकडून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असे वाटते की, हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. माझ्या वारंवार होत असलेल्या चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत. पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचे असते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here