नागपूरः मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिलेला भर चौकात जिवंत जाळण्यात ( ) आले. ही थरारक घटना सदरमधील जवळील हल्दिरामसमोर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. भर चौकात घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

(वय ४० रा. महेंद्रनगर), असे मृतकाचे नाव आहे. शबाना या अजनीतील टाटा मोटर्स येथे काम करीत होत्या. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून काम आटोपून शबाना या मोपेडने घरी जात होत्या. सदरमधील हल्दिरामसमोर एका तरुणीसोबत तरुण वाद घालत असल्याचे शबाना यांना दिसले. त्यांनी मोपेड थांबवली. त्या तरुणाला समाजविण्यासाठी गेल्या. समजावित असतानाच तरुण संतापला. त्याने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकले. माचिसची काडी उगारून त्यांच्या अंगावर फेकली. त्यानंतर तरुण तरुणीला घेऊन मोटरसायकलने पसार झाला. शबाना यांना जळताना बघून नागरिकांनी धाव घेतली. पाणी टाकून आग विझवली. नागरिकांनी शबाना यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here