राज्यात आज करोना २,८५४ नवीन रुग्ण आढळून आले. तर ६० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.५७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,५१,९१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,१६,२३६ (१५.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६४,१२१ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत, तर ३,७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण
ब्रिटनमधील नवीन करोना व्हायरसमुळे सर्वच देश सतर्क झाले आहेत. नवीन करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २५ नोहबर २०२० नंतर राज्यात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याची माहिती पुढील प्रमाणे-
– आज राज्यात आर टी पी सी आर चाचण्या करण्यात आलेले प्रवासी – ११२२
– यापैकी करोना बाधित आढळलेले प्रवासी – १६ ( नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १)
– पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी पुण्यातील NIV येथे पाठण्यात आले आहेत.
– बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ जणांपैक २ जण करोना बाधित आढळून आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times