महाराष्ट्र सरकारने कोरेगाव भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे सोपविला. ही कृती राज्यघटनेच्या विरोधात आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास आज अचानक महाराष्ट्र पोलिसांकडून काढून घेऊन एनआयएकडे वर्ग करण्यात आला. केंद्राकडून महाराष्ट्राचे मुख्य सचिव तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना तसे कळवण्यात आले. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
पवारांच्या पत्रानंतर हालचाली?
प्रकरणी एसआयटी स्थापन करून त्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कोरेगाव भीमाच्या बाबतीत फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला. माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. पोलिसांना हाताशी धरून घडविलेले ते एक षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचाच सगळा डाव होता. पोलिसांनी या प्रकरणात बहुतेक पुरावे तोडून-मोडून सादर केले, असा गंभीर आरोप पवारांनी या पत्रात केला आहे. एकीकडे याप्रकरणी शरद पवार यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली असताना हा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिल्यानेच केंद्र व राज्य सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!
Thank you great posting about essential oil. Hello Administ . Casibom