मुंबईः अॅमेझॉनवर मराठी भाषेचाही पर्याय असावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (maharashtra navnirman sena) केली होती. ‘मनसे’ने आंदोलन करत अॅमेझॉनला ( ) दणका दिला. अखेर अॅमेझॉनने आपली सेवा मराठी भाषेतही देण्याची तयारी दर्शवली आहे.

अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष ( ) यांना फोन करून दिलगिरी व्यक्त केली. तसंच आपल्या डिजिटल प्लॅफॉर्मवर मराठी भाषेचाही समावेश करणार असल्याचं स्पष्ट केलं, अशी माहिती ‘मनसे’ पदाधिकाऱ्यांनी दिली. तसंच ‘मनसे’ने यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहितीही दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर अॅमेझॉनने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याची तयारी दर्शवली आहे, असं ‘मनसे’ने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अॅमेझॉनने केलेल्या ट्विटला टॅग करत ‘मनसे’ने हे ट्विट केलं आहे.

अॅमेझॉनचं ट्विटमधून स्पष्टीकरण

अॅमेझॉन आपली ऑनलाइन शॉपिंग सेवा ही मराठीसह भारतातील सर्वच प्रमुख भाषेत देणार आहे. यासाठी अॅमेझॉन कटिबद्ध आहे. मराठी भाषेत ऑनलाइन शॉपिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. अधिक ग्राहक आणि विक्री वाढवण्यासाठी मराठीसह इतर भाषांचाही समावेश करणार असल्याचं अॅमेझॉननं ट्विट करून स्पष्ट केलं आहे. अॅमेझॉनने ट्विटमध्ये ‘मराठी भाषेत लवकरच’ याचा फोटोही शेअर केला आहे.

‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’ असे ठणकावत अॅमेझॉनवर मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी या मागणीवरून मनसैनिकांनी पुणे आणि मुंबईत अॅमेझॉनचं कार्यालय व वेअरहाऊसवर धडक देत तोडफोड केली.

‘नो मराठी, नो अॅमेझॉन’, असे फलक मुंबईत सर्वत्र लावत मनसेने जोरदार मोहीमही उघडली. दुसरीकडे अॅमेझॉनच्या अनेक फलकांनाही मनसेने लक्ष्य केलं. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने मनसे विरुद्ध मुंबईतील दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली. अॅमेझॉनच्या याचिकेवरून न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अॅमेझॉनच्या कामात मनसेने कोणताही अडथळा आणू नये. मनसेवर अॅमेझॉनने जे आरोप केले आहेत त्यावर १३ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राज यांनी ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे, असेही नमूद करण्यात आले आहे. आता अॅमेझॉनकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याने हा वाद मिटण्याची चिन्ह आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here