कोटपुतली, राजस्थानः कृषी कायद्यांविरोधात ( farm laws ) शेतकऱ्यांचं आंदोलनं ( ) आणि विरोधकांडून होत असलेले हल्ले पाहता एनडीएतील घटक पक्षांमधील ( ) नाराजी वाढत चालली आहे. सत्ताधारी भाजप शेतकर्‍यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रीय लोकतांत्रित पार्टीचे नेते ( RLP) हनुमान बेनीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एनडीएतून बाहेर पडत असल्याचं घोषणा केली. शिवसेना आणि अकाली दल आधीच एनडीएतून बाहेर पडले आहेत. आता आरएलपीनेही एनडीए सोडली आहे.

एनडीएचे सहयोगी असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक (आरएलपी) चे राष्ट्रीय संयोजक हनुमान बेनीवाल यांनी एनडीए सोडण्याची घोषणा केली. ‘एनडीए सोडत असल्याची घोषणा करतो’, असं बेनीवाल म्हणाले. आरएलपीपूर्वी अकाली दलानेही कृषी कायद्यांविरोधात एनडीए सोडली आहे.

केंद्रातील मोदी सरकारकडे ३०३ खासदारांचं पाठबळ आहे. यामुळे ते कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाहीत. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राजस्थानातील १,२०० किलोमीटर दूर असलेले शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना होत आहेत. हरयाणा सीमेवरील शाहजहांपूर येथे बैठक झाल्यानंतर एनडीएत राहण्याचा किंवा सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजस्थानमधील २ लाख शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याचं नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी सांगतिलं. एनडीएत रहायचे की नाही, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं बेनीवाल म्हणाले.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत जाट नेते हनुमान बेनीवाल यांनी यापूर्वीच संसदेच्या तीन समित्यांच्या सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. बेनीवाल यांनी उद्योगविषयक संसदीय स्थायी समिती, याचिका समिती आणि पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्या सल्लागार समितीचा राजीनामा दिला आहे. या कायद्यांविरोधात निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाने आधीच एनडीए सोडली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here