बेंगळुरूः कृषी कायद्यांविरोधात ( ) शेतकऱ्यांचे आंदोलन ( ) सुरू असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी एकदा खुल्या विचाराने नवीन कृषी कायद्यांचा प्रयोग करू पाहा, असं कुमारस्वामी म्हणाले. शेतकरी आंदोलनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवर विपरित परिणाम होण्याचा इशारा देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा तढा सोडवण्याचं आवाहन केलं.

केंद्र सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चांगला समन्वय असला पाहिजे. नवीन कृषी कायद्यांवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या आवाहनावरून एक आशा निर्माण झाली आहे. नवीन कायद्यांची अंमलबजावणी होऊ द्या, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलंय. काही समस्या असल्यास कायदे मागे घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर नक्कीच विचार केला पाहिजे’, असं कुमारस्वामी म्हणाले.

‘कृषी क्षेत्र चक्रव्यूहातून काढण्यासाठी नवीन प्रयोग गरजेचे’

‘चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी कृषी क्षेत्राने नवीन प्रयोगासाठी तयार असले पाहिजे. बऱ्याच काळापासून भारतीय कृषी क्षेत्र एका चक्रात अडकले आहे, हा विचार कित्येक वर्षांपासून मांडला जात आहे. यामुळेच कोणत्याही नवीन प्रयोगासाठी तयार असायलं हवं. शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या हिताचे असेल तर’, असं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं.

‘भारताच्या प्रतिमेला धक्का लागू देऊ नका’

भारतात काही समस्या आहेत हे शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून दिसून येत आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने मिळवलेली प्रतिष्ठा आणि त्याच्या प्रतिमेला नवीन कृषी कायद्यांद्वारे आणि त्या कायद्यांविरोधात होणाऱ्या आंदोलनाने धक्का बसू नये, असं आवाहन कुमारस्वामींनी केलं.

‘आंदोलन संपवण्यासाठी PM मोदींनी पुढाकार घ्यावा’

पंतप्रधान झाल्यावर मोदींनी जी प्रतिष्ठा मिळवली तिचे अशा आंदोलनांमुळे नुकसान होऊ शकते. शेतकर्‍यांना अडचणीत येऊ नये. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांद्वारे अप्रत्यक्षरित्या संदेश देण्याऐवजी संपवण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वात निर्णायक बैठक घेण्यात यावी, अशी मागणी कुमारस्वामी यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here