मेलबर्न: 2nd test भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सुरू आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांत रोखले आणि दुसऱ्या दिवशी आघाडी घेतली. पहिल्या दिवसापाठोपाठ दुसऱ्या दिवशी ही भारताने सामन्यावर वचर्स्व ठेवले. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणे( )चे सर्व जण कौतुक करत आहेत. फक्त भारतीय माजी खेळाडू नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू देखील त्याचे कौतुक करत आहेत.

वाचा-

अजिंक्यने ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली होती आणि गोलंदाजांचा वापर केला यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर () यांना प्रभावित केले. पण गावस्कर म्हणाले मी अजिंक्यचे कौतुक करणार नाही. कारण ते खुप घाईचे होईल. त्याच बरोबर माझ्यावर असा आरोप केला जाईल की मी मुंबईच्या खेळाडूंचे समर्थन करतोय.

वाचा-

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने फलंदाजांचा आक्रमकपणे वापर केला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ७२.३ षटकात १९५ धावांत संपुष्ठात आला. राहणेच्या नेतृत्वावर विचारले असता गावस्कर म्हणाले, मी इतक्या लवकर निष्कर्ष काढणार नाही. जर मी त्याला शानदार कर्णधार म्हटले तर माझ्यावर मुंबईच्या खेळाडूंना पाठिंबा दिल्याचा किंवा आणखी कसला तरी आरोप केला जाईल.

वाचा-

यामुळेच मी या गोष्टीत पडणार नाही. पण रहाणेने ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली त्याने मी प्रभावित झालो आहे. ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज मार्नस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस डेह यांना या फिल्डिंगमुळे बाद करता आले. अजिंक्यला मी गेल्या दोन कसोटी आणि वनडे सामन्यात ज्या पद्धतीने नेतृत्व करताना पाहिले आहे त्यानुसार त्याच्याकडे फिल्डिंग कशी लावावी याची समज आहे, असे गावस्कर म्हणाले.

गोलंदाजाने फिल्डिंग ज्या पद्धतीने लावली आहे त्यानुसार गोलंदाजी करणे आवश्यक आहे. गोलंदाजांनी असे केले तरच कर्णधार चांगला वाटतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here