वाचा-
( ) स्पर्धेत सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबई क्रिकेट संघाने या स्पर्धेसाठीचा संघ शनिवारी जाहीर केला. करोना व्हायरसनंतर देशांतर्गत क्रिकेटला मुश्ताक अली टी-२० स्पर्धेपासून सुरूवात होणार आहे.
वाचा-
मुंबई संघात सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून या संघात आदित्य तारे, यशस्वी जयसवाल, सरफराज खान, सिद्धेश लाड आणि शिवम दुबे सारखे खेळाडू आहेत. या शिवाय जलद गोलंदाज धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि फिरकीपटूंमध्ये अथर्व अंकोलेकर आणि श्म्स मुलानी यांचा समावेश केला गेला आहे.
वाचा-
सर्वांची होणार करोना टेस्ट
मुंबई क्रिकेट असोसिएशने दिलेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या सर्व खेळाडूंना २९ डिसेंबर रोजी वानखेडे मैदानावर करोनासाठीची आरटी-पीसीआर टेस्टचा रिपोर्ट द्यावा लागणार आहे. हा रिपोर्ट नेगेटिव्ह असेल तर संघात समावेश केला जाईल. मुंबईचा संघ सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीतील सर्व लढती घरच्या मैदानावर खेळणार आहे.
वाचा-
असा आहे संपूर्ण संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तारे (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, आकर्षिक गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रंजने, सुजीत नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश दाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारदे, शम्स मुलानी हार्दिक तामोर, आकाश पारकर आणि सुफियान शेख
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times