दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने कालच्या १ बाद ३६ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. शुभमन गिल आणि पुजार यांनी कालच्या धावसंख्येत ३० ची भर टाकली. गिल अर्धशतक करणार असे वाटत होते पण पॅट कमिन्सने त्याला ४५ वर बाद केले त्यानंतर कमिन्सने भारताला आणखी एक धक्का दिला. पुजारा १७ धावांवर बाद झाला. ३ बाद ६४ अशी अवस्था असताना कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी संयमी खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा त्यांनी यशस्वी सामना केला. विकेट दिली नाही. रहाणे-विहारी जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. विहारीला लायनने २१ वर बाद केले आणि भारताची चौथी विकेट घेतली.
त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने रहाणेसोबत धावांचा वेग वाढवला. या दोघांनी अर्धशतकी (५७) भागिदारी करून संघाला ऑस्ट्रेलियाच्या जवळ पोहोचवले. पण पंत २९ धावा करून बाद झाला. दरम्यान अजिंक्य रहाणेने अर्धशतक पूर्ण केले.
पंतच्या जागी आलेल्या रविंद्र जडेजाने रहाणेच्या सोबतीने कसोटी सामन्यावर पकड मिळून दिली. या जोडीने धावांचा वेग वाढवला आणि प्रथम आघाडी मिळून दिली. अजिंक्यने त्याची अँकर फलंदाजीची स्टाइल बदलली. त्याने चौकार मारत कसोटी क्रिकेटमधील १२वे शतक पूर्ण केले. पावसाच्या व्यत्ययामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा अजिंक्यने २०० चेडूंत १२ चौकारासंह नाबाद १०४ धावा तर रविंद्र जडेजाने १०४ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात ८२ धावांची आघाडी घेतली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times