प्रवीण चौधरी/ म. टा. प्रतिनिधी, जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते () यांना भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आक्रमक झाली आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी पक्ष कार्यालयात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने एकनाथ खडसे यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. ३० डिसेंबर रोजी त्यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. ही बाब स्वतः खडसेंनी काल शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितली. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात एकत्र येत विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, वाल्मीक पाटील, प्रदीप भोळे, अजय बढे आदी उपस्थित होते.

यावेळी भाजप व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘ईडी झाली येडी’, ‘भाजप सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली.

‘भाजपचे सूडाचे राजकारण’

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले की, भाजपकडून सूडाचे राजकारण केले जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत असून, हे खपवून घेणार नाही. भोसरीतील भूखंडाच्या व्यवहाराची यापूर्वी विविध यंत्रणांमार्फत सखोल चौकशी करून खडसेंना क्लीनचिट दिली आहे. असे असताना आता पुन्हा या प्रकरणाची चौकशी करणे योग्य नाही. ईडीने खडसेंना काढलेली नोटीस त्वरित मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभिषेक पाटील यांनी दिला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here