मुंबई: करोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय असलेल्या दोन्ही रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आल्याने त्यांना करोनाचा संसर्ग नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांसह पालिका डॉक्टरांनीही सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.

चीनमध्ये करोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतही करोनाचे चार संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी दोघेजण चीनमधून मुंबईत आले होते. दोघांनाही खोकला आणि सर्दीचा प्रचंड त्रास जाणवत होता. त्यामुळे या चारही रुग्णांना मुंबई पालिकेच्या रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले होते. या चारही रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही संस्थेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे नमुने निगेटीव्ह आले असून त्यातील एकजण मुंबईचा तर दुसरा बंगळुरुचा रहिवाशी आहे. तिसऱ्या रुग्णाला व्हायरल सर्दी असल्याचं आढळून आल्याची माहिती मुंबई पालिका प्रशासनाने आज रात्री उशिरा दिली. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. दरम्यान, जगभरात करोना व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

करोना आजाराची लक्षणं

>> सर्दी, खोकला
>> तीव्र ताप

श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर लक्षणं

>> श्वास घ्यायला त्रास होणे
>> न्यूमोनिया
>> अतिसार
>> काही रुग्णांमध्ये मुत्रपिंड निकामी होणं
>> प्रतिकारशक्ती कमी होणं

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here