ही घटना दोन आठड्यांपूर्वीची आहे. ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुपरस्प्रेडर सांताक्लॉजने आपल्या काही सहकाऱ्यांसह दोन आठवड्यांआधी बेल्जियममधील एन्टवर्पमधील एका केअर होमला भेट दिली होती. त्यानंतरच्या काही दिवसांतच होम केअरमधील अनेकजण आजारी पडू लागलेत. सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी होम केअर कर्मचाऱ्यांसह १५७ जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आहे. त्यानंतर सांताक्लॉजला सुपरस्प्रेडर ठरवण्यात आले. होम केअरमधील १८ जणांचा करोनाने मृत्यू झाला असल्याचे वृत्त ‘डेली मेल’ने दिले आहे. त्यापैकी पाचजणांचा मृत्यू २४ आणि २५ डिसेंबर रोजी झाला.
वाचा:
महापौर विम कियर्य यांनी होम केअरसाठी वाईट परिस्थिती असल्याचे सांगितले. आगामी काही दिवस कठीण असणार आहेत. सांताक्लॉजने होमकेअरला भेट दिली तेव्हा नियमांचे पालन करण्यात आले असल्याचे होमकेअर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. मास्कचा वापर सर्वांनीच केला असल्याचे फोटोत दिसून आहे. मात्र, होमकेअरमध्ये असणाऱ्या वृद्धांच्या नातेवाईकांनी या नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप केला.
वाचा:
वाचा:
बेल्जिअममधील प्रमुख वायरोलॉजिस्ट मार्क रॅन्स्ट यांनी सांगितले की सांताक्लॉजमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर संसर्गाची बाधा झाली असण्याची शक्यता आहे. तर, होमकेअरमधील खराब वायुविजन व्यवस्थाही करोनाचा संसर्गासाठी जबाबदार असू शकते, असेही त्यांनी म्हटले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times