म.टा. प्रतिनिधी, नगर: सामाजिक कार्यकर्त्या खून प्रकरणात फरारी असलेला मुख्य सूत्रधार पत्रकार याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शहरातील एका विवाहित महिलेचा केल्याचा गुन्हा त्याच्याविरूद्ध दाखल करण्यात आला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या सूनेने कोतवाली पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी बोठेविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात जरे यांचा गळा चिरून खून झाला. हा खून बोठे याने सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप आहे. तसा गुन्हा बोठेविरूद्ध पारनेर तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामध्ये सत्र न्यायालयाने बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र, आता घटनेला महिना होत आला तरीही बोठे फरारी आहे. अशातच आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले आहे.

एका विवाहित तरूणीने नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आज फिर्याद दिली. बोठे याने वेळोवेळी आपला विनयभंग केल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. अर्थात या घटना ३० नोव्हेंबरपूर्वीच्या आहेत. सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० याकाळात वेळोवेळी विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सासूशी ओळख असल्याने असल्याने बोठेचे आमच्या घरी येणे जाणे असे. घरी आल्यावर सासूशी बोलत असताना आपल्याबद्दल अश्लील शेरेबाजी करणे, हावभाव करणे, स्पर्श करणे तसेच मोबाइलवर संपर्क साधून पाठलाग करणे अशी कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी बोठेविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here