कतरिनानं सलमानला शुभेच्छा देताना इस्ट्राग्रावर स्टोरी शेअर केली होती. सलमानच्या फोटोसोबत तिनं ‘Happy birtday to a great humen beaing’असं कॅप्शनही लिहिलं आहे. कतरिनाचं नाव सध्या अभिनेता विकी कौशल याच्यासोबत जोडण्यात येत आहे. असं असताना तिनं सलमानला दिलेल्या या खास शुभेच्छा चर्चेचा विषय़ ठरत आहेत.
यंदा पार्टी नाही
करोनामुळं यंदा सलमान खानच्या बर्थडेनिमित्तानं असलेली जंगी पार्टी झाली नाही. सलमान त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसवर आहे. मीडियाचे प्रतिनिधी आणि फोटोग्राफर यांच्यासोबत त्यानं काल रात्री केक कापून शुभेच्छांचा स्विकार केला.
बिग बॉसच्या सेटवर सेलिब्रेशन
अभिनेत्री रविना टंडन आणि जॅकलिन फर्नांडिस या बिग बॉसच्या रविवारी वीकेंड वॉर एपिसोडमध्ये दिसणार आहेत. बिग बॉसच्या स्टेजवर सलमाननं या सगळ्यांसोबत वाढदिवसाचा केक कापला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times