एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यानुसार खडसेंना बुधवारी (३०डिसेंबर) मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. खडसे काल शनिवारी सायंकाळी मुक्ताईनगर येथून जळगावात आपल्या मुक्ताई निवासस्थानी आलेले होते. आज दुपारी कुटुंबीयांसह वाहनांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईला आपण ३० रोजी पोहचणार आहोत, आधी एका लग्न समारंभाला जात असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकनाथ खडसे यांच्या सोबत पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, कन्या ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर देखील आहेत.
भोसरीतील भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी आपल्याला ईडीने नोटीस बजावली असून, आपण या चौकशीसाठी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देऊ, असे खडसेंनी कालच स्पष्ट केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times