म. टा. प्रतिनिधी, सांगली: ‘पीएमसी घोटाळ्याबाबत ईडीने किंवा त्यांच्या पत्नीस नोटीस पाठवल्याची नेमकी माहिती मला अजूनपर्यंत मिळालेली नाही. मात्र, कर नाही तर डर कशाला? संजय राऊत ( ) हे प्रतिभावान व्यक्ती आहेत. काम नसलेल्या वेळेत ते अनेकदा शेरोशायरी, कवितांच्या ओळी ट्विट करत असतात. ईडी त्यांचे काम करीत आहे,’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते ( ) यांनी व्यक्त केली. ते इस्लामपूर (जि. सांगली) येथे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस मिळाली आहे. या नोटिशीनंतर केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक विरोधकांमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ईडीने पाठवलेल्या नोटिशीबाबत नेमकी माहिती मला अजूनपर्यंत मिळालेली नाही. याबाबत ईडीच्याच अधिकाऱ्यांना विचारावे लागेल. मात्र, नोटीस मिळाली असेल तर, कर नाही तर त्याला डर कशाला?’ संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटबाबत फडणवीस म्हणाले, ‘राऊत हे प्रतिभाशाली व्यक्ती आहेत. काम नसलेल्या वेळेत ते अनेकदा शेरोशायरी, कवितांच्या ओळी ट्विट करीत असतात.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here