पीएमसी बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या सहकार्याने वर्षा राऊत यांनी ५० लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असल्याचं सांगण्यात येतंय.
राऊत यांनी ट्विट करून ईडी अर्थात केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया…’ अशा बॉलिवूडमधील एका लोकप्रिय गाण्याचा ओळी शेअर करत राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी ईडीकडे
पीएमसी बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ईडी ही चौकशी करत आहे. गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर २०१९ ला ईडीकडे ही चौकशी देण्यात आली होती. पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते.
काय आहे पीएमसी बँक घोटाळा?
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी बँक) ४ हजार ३३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ हून अधिक जणांना अटक केलीय. ‘पीएमसी’च्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवल्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती पाहून तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले. या पथकाने प्रथम ‘एचडीआयएल’चे कार्यकारी अध्यक्ष राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान यांना अटक केली. यानंतरही अटकेचा हा सिलसिला सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times