: घरात शिकवणी घेऊन मिळणाऱ्या पैशांत उदरनिर्वाह करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरूणीला नोकरीचे प्रलोभन देऊन तिच्यावर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस ( ) आली आहे. नोकरीसाठी मुंबईला घेऊन जाणार असल्याच्या भूलथापा दिल्या. त्यानंतर तिच्यावर अत्याचार () केला. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी महेबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर, जि. बीड) याच्याविरोधात औरंगाबादमधील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जकात नाका भागात राहणारी एक उच्चशिक्षित तरूणी आपल्या घरी शाळेतील मुलांची शिकवणी घेऊन उदरनिर्वाह करते. दोन महिन्यांपूर्वी ही तरुणी शिकवणीसाठी बीड बाह्यवळण रस्त्यालगत जागेचा शोध घेत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख मेहबूब इब्राहिम शेख याच्याशी झाली. शेख याने तरुणीला शिक्षणाबाबत विचारणा केली. तिने बीए डी.एड झाल्याचे सांगितले. त्यावर शेख यांने संबंधित तरूणीला मुंबईत नोकरी मिळवून देतो अशी बतावणी केली. यानंतर तरुणी आणि शेख यांची त्याच्या फ्लॅटवर भेट झाली. त्यावेळी नोकरीसाठी मुंबईला जायचे आहे, असे तिला सांगितले.

पीडित तरुणी १४ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता एका हॉटेलासमोर थांबली. काही वेळात शेख हा कार घेऊन तिथे आला. त्याने तरूणीला कारमध्ये बसवले आणि एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला कारमधून बाहेर काढले. या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. यावरून शेखविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मावशीने दिला आधार

या घटनेनंतर पीडित तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. तरुणीने आपल्या मावशीला सर्व हकिकत सांगितली. तिने तिला मानसिक आधार दिला. त्यानंतर सिडको पोलीस ठाणे गाठून तरुणीने शेखविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आश्लेषा पाटील करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here