संगिता (ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. आकाश दादाभाऊ पोकळे (वय २०, रा. कोयाळी, बापदेव वस्ती, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आकाश याची बहीण हर्षदा योगेश कोळेकर (वय २२, रा. कोयाळी, खिरपाड वस्ती, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत कोयाळी, खिरपाड वस्ती येथे ही घटना घडली आहे. आकाश याचे लग्न झाले नव्हते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी संगिता हिने त्याच्याशी सोशल मीडियावरून मैत्री केली. त्याच्याशी चॅटिंग करू लागली. आकाशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर संगिताने आकाशकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास नातेवाईक व समाजात बदनामी करण्याची धमकी देत त्याला मानसिक त्रास दिला. त्यातूनच आकाश याने आत्महत्या केली. आळंदी पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times