वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी अखेर कोव्हिड मदतनिधी आणि अन्य खर्चांच्या बिलांवर स्वाक्षरी केली आहे. लाखो अमेरिकी नागरिकांना मिळणारा बेकारभत्ता आणि अन्य सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, दुसरीकडे या पॅकेजमधून अमेरिकन अतिशय कमी मदत मिळणार असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ष अखेरीच्या कोव्हिड मदतनिधी आणि अन्य खर्चांच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने लाखो अमेरिकी नागरिकांना मिळणारा बेकारभत्ता आणि अन्य सवलती रोखल्या गेल्याचे वृत्त समोर आले होते. ट्रम्प यांनी काही आक्षेप घेत स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनेक बेरोजगारांना मिळणारा बेरोजगार भत्ता शनिवारी मध्यरात्रीपासून बंद झाला होता.

वाचा:

ट्रम्प यांनी कोविड मदतनिधीमध्ये अधिक निधींच्या तरतुदीची मागणी केली होती. कोव्हिड मदतनिधी सध्या सहाशे डॉलर आहे. तो दोन हजार डॉलर करावा, अशी ट्रम्प यांची आग्रही मागणी आहे. मात्र, त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाने ही मागणी फेटाळली.

वाचा:
काय आहे प्रकरण?

करोना काळात रोजगार हरवल्याने नियमात बसणाऱ्या प्रत्येक अमेरिकी नागरिकाला ६०० डॉलर करोना मदतनिधी देण्यास काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांत मान्यता मिळाली होती. मात्र, बहुसंख्य अमेरिकी नागरिकांची दोन हजार डॉलर्स मिळावेत, अशी मागणी आहे. रिपब्लिकन पक्षाने संसदेच्या नाताळ अधिवेशनादरम्यान या मागणीला नकार दिला होता आणि प्रत्येकी ६०० डॉलर देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, स्वत:च्या पक्षाविरोधात भूमिका घेत अध्यक्ष ट्रम्प नागरिकांना प्रत्येकी दोन हजार डॉलर मिळावेत अशी मागणी केली.. ‘मी अमेरिकी नागरिकांना ६०० नव्हे तर दोन हजार डॉलर देऊ इच्छितो,’ असे ट्विट ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील पाम बीचवरून केले होते. ते सध्या येथे सुट्टीसाठी आले आहेत.

वाचा:

सुमारे ९५ लाख अमेरिकी नागरिक करोना काळातील मदतनिधीवर अवलंबून आहेत. या योजनेची मुदत शनिवारी संपली. आता या काळात रोजगार गमावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळणार नसल्याने त्यांची मोठी अडचण होणार होती. एक कोटीहून अधिक नागरिकांची मदत लगेचच थांबणार असून अन्य लाखो लोकांना काही आठवड्यांत त्याचा फटका बसण्याची भीती होती असे ब्रुकिंग्ज इन्स्टिट्युटमधील लॉरेन बावर यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here