वाचा:
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. ईडीच्या या नव्या नोटिशीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल, ‘कर नाही तर डर कशाला?’ असा टोला राऊत यांना हाणला होता. फडणवीसांच्या या टोलेबाजीचा नवाब मलिक यांनी आज समाचार घेतला. ‘तुमच्या कारवाईला घाबरतं कोण? महाराष्ट्रातील कोणीही नेता ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही. शरद पवारांनाही अशीच नोटीस पाठवण्यात आली होती. तिचं काय झालं? ती नोटीस मागे का घेतली गेली?,’ असा सवाल मलिक यांनी केला. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा:
‘महाराष्ट्रात ईडीचा खेळ किंवा वापर नवा नाही. जे भाजपच्या, केंद्र सरकारच्या विरोधात असतील त्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवण्याचं काम सुरू आहे. विरोधकांना बदनाम करणं किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण करणं हा त्यामागचा हेतू आहे. भाजपकडून यंत्रणेचा गैरवापर भाजपकडून होतोय याविषयी कुणाच्या मनात शंका नाही. मात्र, यंत्रणेचा वापर करून सत्ता मिळवणं शक्य नाही हे त्यांना कळलं पाहिजे,’ असंही मलिक यांनी सुनावलं.
केवळ नोटीस येणं महत्त्वाचं नाही!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मलिक यांच्या सुरात सूर मिसळला. ‘ईडीच्या नोटिशीमध्ये आता काही नवीन राहिलेलं नाही. एखाद्या प्रकरणाशी संबंध असो किंवा नसो, भारतात अनेक लोकांना नोटिसा बजावल्या जातात. हे सगळं इतकं स्वस्त झालेलं आहे की लोकांनाही आता त्याचं काही खरं वाटत नाही. त्यामुळं याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही,’ असं पटेल म्हणाले. ‘चुकीचं कोणी केलं असेल तर चौकशीत सत्य समोर होईलच, पण केवळ नोटीस येणं याला काहीच महत्त्व नाही,’ असं पटेल म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times