मुंबई: देशातील प्रख्यात तथा ‘सेक्सपर्ट’ डॉ. यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. टाइम्स समूहाच्या ” या दैनिकातील ‘आस्क द सेक्सपर्ट’ या स्तंभामुळं त्यांना एक वेगळी मिळाली होती. लैंगिक आरोग्यविषयक लेखन व समुपदेशनामुळं वत्स हे अनेकांचे फ्रेंड, फिलॉसॉपर आणि गाइड बनले होते. (Dr. Passes Away)

वत्स यांच्या मुलांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘आमचे बाबा स्वत:च्या अटींवर एक समृद्ध आयुष्य जगले. त्यांच्या स्वभावाला अनेक पैलू होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत,’ असं त्यांच्या मुलांनी निवेदनात म्हटलं आहे.

लैंगिक विषयावर समुपदेशन करणारा व सल्ला देणारा ‘मुंबई मिरर’मधील त्यांचा स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या स्तंभातून ते लोकांना लैंगिक आरोग्याविषयी उत्तम मार्गदर्शन करायचेच, पण खुसखुशीत उत्तरांनी वाचकांचं मनोरंजनही करायचे. वत्स यांनी १९६० मध्ये स्तंभलेखन सुरू केले. फेमिना, फ्लेअर आणि ट्रेंड या महिलाविषयक मासिकांसाठी त्यांना वैद्यकीय सल्ला देणारे लेखन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९७० पर्यंत त्यांनी अनेक मासिकांमध्ये लेखन केले.

वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतानाच भारतात लैंगिक समस्यांबाबत अज्ञान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. १९७४ मध्ये ‘फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ सोबत सल्लागार म्हणून काम करत असताना त्यांनी देशात लैंगिक शिक्षण कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांचा प्रस्ताव स्वीकारला गेला आणि त्यानंतर अनेक स्तरांतून विरोध झाल्यानंतरही देशात पहिले सेक्स एज्युकेशन, समुपदेशन व उपचार केंद्र सुरू करण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here