मुंबईः ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे अनेक लोक पाहिले आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना देशाबाहेर जावं लागेल,’ असा गंभीर इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला आहे. त्याचबरोबर, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला आहे. यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना इडीची नोटिस आल्यानंतर यासंदर्भात आज राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला आहे.

‘कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र, गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक ईडीच्या कार्यालयात चकरा मारत असून तिथून कागदपत्र व माहिती आणतात,’ असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

‘महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय महाराष्ट्रात सरकार बनवण्यात जे आग्रही होते त्यांना अशा नोटीस पाठवल्या जातात,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘भाजपचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत. मागच्या वर्षभरात त्यांनी मला हे सरकार पाडण्यासंदर्भात धमकावले आहे. हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असं सांगितलं जातंय. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. शिवाय, सरकारच्या खंदे समर्थकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरु आहे,’ असंही राऊतांनी म्हटलं आहे.

‘बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपनं थांबवावं. तुमच्या कुटुंबाच्या व्यावहाराचाही आमच्याकडे हिशोब आहे. राजकीय सुडानेच याला उत्तर दिलं जाईल. भाजपच्या १२० नेत्यांची यादी तयार आहे. ईडीत्यांच्यावर काय कारवाई करते ते पाहणार आहे,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here