पिंपरी: डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर मित्राने एअर होस्टेस तरुणीला हॉटेलवर नेऊन जबरदस्ती दारू पाजली. तिला घरी आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिच्यावर केला. या प्रकरणी पीडितेने पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अभिजीत असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो काळेवाडीतील तापकीर नगर चौकात राहतो. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आणि आरोपीची ओळख एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीला शनिवारी दुपारी हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेले. तिथे तिला जबरदस्ती दारू पाजली. आरोपीने तिला त्याच्या घरी नेले. तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

मित्राच्या या कृत्याने हादरलेल्या तरुणीने त्याला विरोध केला. त्यावरून आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, असेही तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने हिंजवडी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here