मुंबईः राजकारणात समोरासमोर लढायचं असतं. घरातल्या मुलांवर, महिलांवर हल्ले करणारे नामर्दपणा असल्याचा आरोप करणाऱ्या यांच्यावर भाजपनं पलटवार केला आहे. कंगना राणावतचं ऑफिस बुलडोझरनं पाडलं तो मर्दपणा होता का?, असा सवाल भाजप नेते यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटिस बजावण्यात आल्यानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. राऊतांनी केलेल्या या टीकेला उत्तर देताना भाजप नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कंगना राणावतच घर तोडताना शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का? कंगना राणावतला मुंबईत येऊ देणार नाही, अशी भूमिका घेणं मर्दपणा होता का?,’ असे सवाल शेलार यांनी केले आहेत. तसंच, ‘आधी शिवसेनेनं स्वतःकडे बघावं, स्वतःच्या पायाखालची जमीन घसरली आहे,’ असा टोलाही लगावला आहे.

‘एका ईडीच्या नोटीसमुळे ते हादरले आहेत. दीड दमडीचा हिशोब देऊन त्यांनी स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करावं. कर नाही तर डर कशाला. डराव डराव करण्यापेक्षा हिशोब द्यावा,’ असा सल्ला शेलार यांनी राऊतांना दिला आहे. तसंच, ‘राऊतांनी दमबाजी करु नये भाजपा दमबाजीला घाबरत नाही,’ असा इशाराही दिला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र, गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक ईडीच्या कार्यालयात चकरा मारत असून तिथून कागदपत्र व माहिती आणतात, असा आरोप राऊतांनी केला होता. तसंच, महाराष्ट्रातचं सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here