मुंबई: लोकलच्या प्रतीक्षेत असलेला एक ४६ वर्षीय प्रवासी भोवळ येऊन प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर कोसळला. बाजूलाच एक प्रवासी होता मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तिथून काही अंतरावर तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलातील महिला जवान यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी धावत जात ट्रॅकवर उडी मारली व त्या प्रवाशाला सावरलं. लोकल अगदी काही अंतरावर असतानाच हाताने इशारा करत त्यांनी मोटरमनला लोकल थांबवण्याची विनंती केली आणि त्यानेही प्रसंगावधान दाखवल्याने प्रवाशाचे प्राण वाचले. ( Update )

वाचा:

मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील स्टेशनवर २६ डिसेंबर (शनिवार) रोजी दुपारी ही घटना घडली. भोवळ येऊन पडलेल्या प्रवाशाचे नाव असून लता भोसले या महिला जवानामुळे इराणी यांचे प्राण वाचू शकले. इराणी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्यांची तब्येत उत्तम असून टॅक्सीने त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

वाचा:

सीसीटीव्हीतील दृष्ये अंगावर काटा आणणारी…

ग्रँट रोड स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अंगावर काटा आणणारा प्रसंग टिपला गेला आहे. प्लॅटफॉर्मवर लोकलची प्रतीक्षा करत उभे असतानाच इराणी यांना भोवळ आली व ते ट्रॅकवर कोसळले. यावेळी त्यांच्या अगदी बाजूलाच एक अन्य प्रवासी उभा होता. प्लॅटफॉर्मवर काही अंतरावर आणखीही प्रवासी होते. मात्र, सुरुवातीला यापैकी कुणीच इराणी यांच्या मदतीला धावलं नाही. त्यानंतर पुढच्याच क्षणी एक महिला सुरक्षा जवान व अन्य एक व्यक्ती धावत आल्या व त्यांनी ट्रॅकवर उडी घेऊन इराणी यांना सावरले. पाठोपाठ अन्य काही प्रवाशांनीही तिथे धाव घेतली. इतक्यात लोकल येत असल्याचे पाहून सगळेच हादरले. मात्र महिला जवान व इतरांनी लोकलच्या मोटरमनला दूरूनच इशारा केला. त्यानेही प्रसंगावधान दाखवत वेळीच लोकलचा वेग आणखी कमी केला व लोकल थांबवली. इराणी यांच्या चेहऱ्यावर पाणी मारण्यात आलं. ते काहीसे सावरताच त्यांना प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं व रुग्णालयात नेण्यात आलं. सदर महिला जवानाचं नाव लता भोसले असल्याचं नंतर सांगण्यात आलं. रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक यांनीही लता यांच्यासह इराणी यांना मदतीचा हात दिला. या दोघांमुळेच इराणी यांचे प्राण वाचू शकले आहेत.

मुंबईत अशाचप्रकारे याआधीही अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले गेले आहेत. अलीकडेच १४ डिसेंबर रोजी अशीच घटना करी रोड रेल्वे स्टेशनवर घडली होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here