वाचा:
चारकोपच्या पाखाडी रोड परिसरात असलेल्या येथे रविवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये मंदिरात झोपलेल्या , आणि मन्नू गुप्ता या तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची चारकोप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मंदिरामधील वॉटर कुलर आणि एअर कुलरचा एखाद्या ज्वालाग्राही पदार्थामुळे स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. न्यायवैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाकडून त्याअनुषंगाने प्राथमिक अहवाल हाती मिळाल्यानंतर यामध्ये काहीतरी घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक घनःश्याम नायर, सहायक निरीक्षक विक्रम बाबर, जिनपाल वाघमारे, उपनिरीक्षक विजय शिंदे, विजय सावंत यांच्यासह पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
वाचा:
आगीमध्ये मृत्यू झालेल्या सुभाष, युवराज आणि मन्नू या तिघांची माहिती काढत असताना याच परिसरात राहणाऱ्या भावेश चांदोरकर याच्यासोबत त्याचे वारंवार भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातच दोन दिवसांपूर्वी युवराजने भावेशला सिगारेट आणण्यास सांगितली. मात्र भावेशने नकार देताच युवराजने त्याला मारहाण केली, असेही काहींनी सांगितले. भावेश आगीच्या घटनेपासून गायब होता. परिसरातील खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांवरून औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे असलेल्या भावेशला पोलिसांनी शोधून काढले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भावेशने पोलिसी खाक्या मिळताच गुन्ह्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन मित्राच्या मदतीने तिघांना जिवंत जाळल्याचे त्याने सांगितले.
वाचा:
दुचाकीतील पेट्रोलचा वापर
भावेश याच्या मनात युवराजबाबत वर्षभरापासून राग खदखदत होता. त्याची हत्या करण्याचे त्याने मनातून ठाम केले होते मात्र संधी मिळत नव्हती. भंडारा असल्याने युवराज रोज मंदिरात झोपत असल्याचे समजताच भावेशने स्वतःच्या दुचाकीतील सुमारे पाच लिटर पेट्रोल एका प्लॅस्टिक कॅनमध्ये काढून ठेवले. पहाटेच्या सुमारास शुकशुकाट असल्याचे पाहून दोघांनी मंदिरात आणि मंदिराभोवती पेट्रोल ओतले आणि मंदिर पेटवून दिले. हे करताना भावेश याचाही हात भाजला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times