कोल्हापूर: ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा आहे, त्याला भाजपशी जोडणं असमंजसपणाचं आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले. किंवा विरोधकांना यांनी लिहिलेली घटना मान्य नाही. त्यामुळेच ते बहुदा काहीही घडलं की त्यावरून टीका करतात, असा टोलाही पाटील यांनी मारला. ( Chandrakant Patil on Updte )

वाचा:

ईडीची कारवाई आणि याचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना लक्ष्य केले. ‘मध्यंतरी राऊत यांनी शंभर जणांची यादी देतो, त्यांना ईडीची चौकशी लावा असे म्हटले होते. त्यांनी शंभरच काय तर दोनशे जणांची यादी द्यावी, कारवाईसाठी पाठपुरावा करावा. आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही. काहीही झालं तरी भाजपच्या नावानं ओरडता कशाला, काही नसेल तर घाबरता का? काहीतरी असेल म्हणून घाबरता ना?’, असा चिमटा पाटील यांनी काढला.

वाचा:

सरकार पाडण्यासाठी आमचे कुठलेही प्रयत्न सुरू नाहीत, असे स्पष्ट करताना ते म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून भाजप प्रभावी काम करत आहे. सत्ताधारी नेत्यांना झोपेतही सरकार जाईल असे वाटत आहे. त्यामुळेच ते आम्ही सरकार पाडणार म्हणून सतत सांगत असतात. आमच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात. पण अशाने आम्ही विचलीत होणार नाही असेही पाटील म्हणाले.

वाचा:

अंबाबाई दर्शन मिशनसाठी नाही: फडणवीस

अंबाबाईचे दर्शन हे कोणतेही मिशन सुरू करण्यासाठी घेतले नाही तर केवळ आशीर्वाद आणि ऊर्जा यासाठीच आज कोल्हापुरात येऊन देवीचे दर्शन घेतले, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी यावेळी सांगितले. सांगली व कोल्हापूर दौरा आटोपून फडणवीस गोव्याला रवाना झाले. त्याआधी त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील होते. अंबाबाईचं दर्शन ही कोणत्या मिशनची सुरुवात आहे, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी मिशनचा इन्कार केला व ते मार्गस्थ झाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here