पुणे: निवृत्त असलेल्या सासऱ्याच्या मोबाइलवर गुपचूप उघडून सूनेने सासऱ्याच्या बँक खात्यातील तीन लाख ९९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर पाठविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Update )

वाचा:

विश्रांतवाडी परिसरात राहणारे निवृत्त पोलिस यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार सूनेवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पोलीस खात्यामधून जुलै २०१९ मध्ये सहायक उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. त्यांच्या मुलाचे लग्न झाले असून त्याचे पत्नीसोबत पटत नसल्यामुळे तो दहा वर्षापासून वेगळा राहतो. त्यामुळे सूनेचा व नातीचा सांभाळ तक्ररादार हेच करतात. तक्रारदार हे निवृत्त झाल्यानंतर शिल्लक रजेचे पावणे सहा लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले होते. तसेच, पेन्शनचे पैसे देखील त्या खात्यावर जमा होतात. तक्रारदार यांना मोबाइल व मोबाइलवरील अॅप व्यवस्थित हाताळता येत नाहीत. त्यामुळे त्यांची सूनच हा मोबाइल हाताळत होती.

वाचा:

तक्रारदार हे घर खर्चासाठी दोन महिन्यातून एकदा बँकेत जाऊन पैसे काढतात. तीन डिसेंबर रोजी तक्रारदार हे जावयासोबत बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी काही पैसे काढल्यानंतर त्यांच्या खात्यावर खूपच कमी पैसे असल्याचा मेसेजवरून लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बँक मॅनेजरकडे जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर अकाउंट उघडून पैसे वेगवेगळ्या खात्यांवर पाठविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी पासबुक भरून घेतले व घरी आले. दरम्यान, ते परत बँकेत चौकशीला गेले असता त्यांनी एका महिलेचे नाव सांगितले आणि ही महिला तक्रारदार यांची सून असल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी सूनेकडे चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पण, बँकेतून आपल्याला हे समजल्याचे सांगताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी ते पैसे १५ दिवसांत परत करण्याचे आश्वासन तिने सासऱ्यांना दिले. मात्र, तिने पैसे न दिल्यामुळे शेवटी सासऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव हे अधिक तपास करत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here