मुंबई: ‘आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमच्याकडं लपवण्यासारखं काही नाही. ज्यांच्याकडं लपवण्यासारखं असतं ते घाबरून भाजपमध्ये जातात. आम्ही शिवसेनेत आहोत. राहणार आणि शिवसेनेतच मरणार,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार यांनी आज भाजपला ठणकावले. (Sanjay Raut Slams Again)

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधला. ‘मी संसदेचा सदस्य आहे. कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. आम्ही स्वत: कायदे करण्याच्या प्रक्रियेत असतो. त्यामुळं सरकारच्या तपास यंत्रणेकडून माझ्या कुटुंबाला एखादा कागद आला असेल तर त्याचा आदर करणं हे माझं कर्तव्य आहे. भलेही त्यात राजकारण असेल,’ असं राऊत म्हणाले. ‘सध्या सरकारी तपास यंत्रणांना दुसरं काही काम नाही. विरोधकांचा मानसिक छळ हे त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य झालं आहे. त्यात त्यांचा पूर्ण दोष नाही. शेवटी ते हुकुमाचे ताबेदार आहे. त्यांची कीव येते,’ असं ते म्हणाले.

वाचा:

‘ यांना आलेली नोटीस मी पाहिलेली नाही. आम्ही त्याला सविस्तर उत्तर देणार आहोत. त्यासाठी वेळ मागून घेतली आहे. आमच्याकडं लपवण्यासारखं काही नाही. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत. आमच्याकडं जे काही आहे ते कधीही लपवलेलं नाही. सध्या वृत्तवाहिन्यांवर जी माहिती दाखवली जात आहे, ती राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रात आहे. गेल्या १५ वर्षांपासून आहे. ज्यांच्याकडं लपवण्यासारखं असतं, ते घाबरून भाजपमध्ये जातात. आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेत मरणार. मला धमकावणारा अजून जन्माला आलेला नाही, असं सांगतानाच, हे सरकार पाच वर्षे टिकणार,’ असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

वाचा:

याशिवाय, राऊत यांनी नेहमीप्रमाणे ट्विटरवर एक हिंदी शेर ट्वीट केला आहे. ‘मला बदनाम करण्याचा किती प्रयत्न करा. पुन्हा नव्या तेजानं उजळून निघेन,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here