याबाबत गोविंद हिरामण यादव (वय ४४) यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शैलेश टॉवरमध्ये सोमवारी पहाटे चार चोरटे शिरले. त्यांनी सुरक्षारक्षक यादव यांना चाकूचा धाक दाखवून पकडले आणि त्यांचे तोंड दाबले. त्यानंतर त्यांना बांधून एक जण त्यांच्याजवळ थांबला. तर चोरटे सोसायटीमध्ये शिरले. साधारण अर्धा तास यादव यांना बांधून ठेवून चोरट्यांनी पाच फ्लॅट फोडले. या घटनेच्या वेळी गस्तीवरील पोलीस सोसायटीच्या प्रवेशद्वारात आलेले दिसत आहेत. चोरटे सोसायटीतून बाहेर पडत होते; पण चोरट्यांना पाहून पोलीसच पळाले. त्यानंतर चोरटे कारमध्ये बसून निघून गेले. या घटनेनंतर नागरिकांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांना सांगितले. त्यानंतर या प्रकरणी चौकशी केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times