वाचा:
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. वर्षा राऊत यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, राऊत यांनी वेळ मागून घेतली आहे. त्यामुळं लवकरच त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. या सगळ्या घटनाक्रमावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सरकारी यंत्रणांच्या मदतीनं छळ केला जात आहे. मात्र, आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही नावं सांगितली तर भाजपच्या नेत्यांना देश सोडून पळावं लागेल,’ असं राऊत म्हणाले होते. बाईच्या पदराआडून लढण्यापेक्षा समोरासमोर लढा, असं आव्हानही राऊत यांनी भाजपला दिलं होतं.
वाचा:
राऊत यांच्या या टीकेचा नीलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार समाचार घेतला आहे. ‘संजय राऊत यांच्यासारखे लोक मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं, ते मैदानात लढण्याची वार्ता करतात. मैदानात आल्यावर त्यांना कळेल ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू’,’ असा टोला नीलेश राणेंनी हाणला आहे.
वाचा:
भाजप व ईडीच्या विरोधात शिवसैनिकांनी मुंबईत काही ठिकाणी पोस्टर झळकावले होते. त्यात भाजपच्या नेत्यांना इशारा देण्यात आला होता. त्याचीही नीलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल, असं शिवसेना म्हणते. शिवसेनेनं देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?, असा प्रश्न करतानाच, ‘ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे,’ अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times