म. टा. वृत्तसेवा, : नाताळ व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत एकटीच फिरण्यासाठी आलेल्या छत्तीसगढ येथील १८ वर्षीय तरुणीला धमकावून तिच्यावर करून फरार झालेल्या सचिन लालताप्रसाद शर्मा (२६) या रिक्षाचालकाला शहर पोलिसांनी १२ तासांत अटक केली.

ही तरुणी २२ डिसेंबर रोजी पश्चिम एक्सप्रेसने वांद्रे रेल्वे स्थानकावर उतरली. ती एकटी असल्याचे पाहून टीसीने तिला चाइल्ड हेल्पलाइनच्या ताब्यात दिले. येथील कार्यकर्त्यांनी तिला मुलींच्या सखी सेंटर होममध्ये दाखल केले. त्याठिकाणी तिची चौकशी करण्यात आल्यानंतर तिला सोडून देण्यात आले. २६ डिसेंबर रोजी सकाळी ती तरुणी पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचली. या ठिकाणी शिवा नावाच्या व्यक्तीसोबत तिची ओळख झाल्यानंतर ती त्याच्यासोबत राहिली होती.

२७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या तिने पनवेल रेल्वे स्थानकाजवळून रिक्षा थांबवली. गांधी गार्डन येथे सोडण्यास सांगितले होते. तरुणी एकटीच असल्याची संधी साधून रिक्षाचालकाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या ठिकाणावरून रिक्षा घेऊन पलायन केले होते. या प्रकारानंतर तरुणीने पनवेल शहर पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. त्यानुसर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे व त्यांच्या पथकाने बारवाई गावातून सचिन लालताप्रसाद शर्मा याला रिक्षासह ताब्यात घेऊन अटक केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here