औरंगाबादः ब्रिटन आणि इतर देशांमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या नव्या व्हायरसचा धोका असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रिटनहून भारतात परतलेल्या सहा जणांमध्ये आढळला होता. यामुळं चिंता अधिक वाढली होती. महाराष्ट्रातही गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक होती. त्यामुळं आरोग्य प्रशासनानदेखील सावध झालं होतं. मात्र, ‘ब्रिटनमधून आत्तापर्यंत महाराष्ट्रात आलेल्या ४३ प्रवाशांमध्ये करोनाचा एकही नव्या करोना स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, नागरिकांनी घाबरण्याचं कारणं नाही,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

‘नव्या करोना संसर्गाचा वेग ७० टक्के जास्त आहे. त्यामुळं संसर्ग अधिक गतीने होण्याची भीती आहे. अमेरिका आणि युरोप खंडात कठोर लॉकडाऊन करत आहेत, असं राज्यातही होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. मास्क, सुरक्षित वावर नियम पाळणे आवश्यक आहे,’ अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांपैकी महाराष्ट्रातील एकूण ४३ जणांना संसर्ग झाला आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआय़व्ही) आतापर्यंत ३२ पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचनेचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here