सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील येथील श्री कधी होणार?, याची उत्सुकता लाखो भाविकांना असते. ही उत्सुकता आज संपली असून यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. येत्या ६ मार्च २०२१ रोजी ही यात्रा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अर्थात यावेळच्या यात्रेवर करोनाचं सावट राहणार आहे. ( 2021 Latest News Update )

वाचा:

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेसाठी दरवर्षी विक्रमी गर्दी पाहायला मिळते. यावेळी मात्र करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरूपात यात्रा पार पडणार आहे, अशी माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली. भाविकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांनी ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणाहून श्री भराडी देवीला आपले सांगणे सांगावे. आई भराडी देवी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल, असे यांनी म्हटले आहे.

वाचा:

आंगणेवाडीची भराडी देवी नवसाला पावणारी आहे, अशी सर्वत्र ख्याती आहे. मुंबई, ठाण्यातील अनेक राजकीय नेते, आमदार-खासदार, नगरसेवक उद्योजक हे मूळचे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे बहुतांश जण दरवर्षी मोठ्या संख्येने आंगणेवाडी यात्रेत सहभागी होतात. चाकरमान्यांचीही मोठी गर्दी भराडी देवी यात्रेला होते. यावर्षी मात्र ही गर्दी यात्रेत दिसणार नाही.

वाचा:

मुख्यमंत्री ठाकरे गेले होते दर्शनाला

करोना संसर्गाने राज्यात मार्च महिन्यापासून थैमान घातले आहे. मार्च महिन्यातच लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात भराडी देवीचा यात्रोत्सव झाला होता. या यात्रेला भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. मुख्यमंत्री १७ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडीत दाखल झाले होते व त्यांनी भराडी देवीचे दर्शन घेतले होते. यावेळी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला होता. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या यात्रेला मात्र भाविकांना करोनामुळे मुकावे लागणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here