वाचा:
प्रकरणी ईडी कडून तपास सुरू असून याच प्रकरणात वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यांना २९ डिसेंबर म्हणजेच आज ईडीसमोर हजर राहायचे होते. मात्र आज त्या ईडीसमोर हजर झाल्या नाहीत. त्यांच्यामार्फत आज एक अर्ज ईडीकडे सादर करण्यात आला होता. त्यात आपणास ५ जानेवारीपर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. ईडीने ही मुदत दिली असून आता त्यांना ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे, असे वृत्त ईडी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
वाचा:
राऊत विरुद्ध भाजप संघर्षाला धार
वर्षा राऊत यांना बजावण्यात आलेल्या ईडी नोटीसवरून आधीपासूनच वातावरण तापलेलं आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसैनिकांनी आक्रमक होत थेट ईडी कार्यालयावर धडक देत तिथे ‘भाजप प्रदेश कार्यालय’, असा बॅनरही सोमवारी लावला होता. त्याचवेळी संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. असल्या नोटिशीच्या कागदांना आम्ही घाबरत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, असे सांगत राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले होते. बायकांच्या पदराआड लपून खेळी करणे भाजपने आता थांबवावे. तुमच्या कुटुंबीयांच्या व्यवहाराचाही आमच्याकडे हिशेब आहे. राजकीय सूडानेच आता याला उत्तर दिलं जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला होता. आज सकाळीही माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला टोला हाणला होता. आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही, ज्यांच्याकडे लपवण्यासारखे असते ते एकतर पळून जातात किंवा भाजपमध्ये जातात, असे राऊत म्हणाले होते. ईडीला काही बाबी तपासायच्या असतील तर त्याला आमचं सहकार्यच राहील, असे नमूद करत आपली पत्नी चौकशीला सामोरी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times