दिल्ली: भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्यानं गौरव केला जातो. त्या लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार. म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला राष्ट्रीय दिन साजरा केला जातो.

लोकशाहीमध्ये प्रत्येक मत मौल्यवान आहे. एका-एका मतानं इथे विरोधक जिंकतात आणि सत्ताधीश कोसळतात. म्हणूनच अरुणाचल प्रदेशमध्ये एका मतदारसंघात असंही एक मतदान केंद्र उभं करण्यात आलं होतं. जिथं फक्त एकच मतदाराची नोंद करण्यात आली आहे. हयुलियांग मतदारसंघातील हे केंद्र देशातल सर्वात छोटं मतदार केंद्र होतं.

अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात हयुलियांग मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अत्यंत तुरळक मतदार आढळतात. यातील सर्वात पूर्वेकडील मालोगाम मतदार केंद्रात मागच्या लोकसभेला केवळ दोन मतदारांची नावं नोंदवण्यात आली होती. यावेळी मात्र एकाच मतदाराचं नाव नोंदवण्यात आलं होतं. हे मतदान केंद्र सर्वात छोटं केंद्र ठरलं होतं. पण एका मतदारासाठीदेखील इथं मतदान घ्यावेच लागेल अशी सूचना निवडणूक आयोगानं स्थानिक प्रशासनाला केली होती.

वाचा:

लोकशाहीत नियमित सामील व्हायला हवं
लोकशाहीत सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे ती ‘सहभागाची’! दुर्दैवानं अनेकांना असं वाटतं की, जनता आणि लोकप्रतिनिधी हे दोन परस्परांपेक्षा भिन्न आणि संपूर्णत: स्वतंत्र असे घटक आहेत. वास्तवात लोकशाहीच काय, पण कोणतीही राज्यपद्धती ही नागरिकांच्या सहभागाशिवाय चालू शकत नाही. हा सहभाग निव्वळ ‘मत’ देणं आणि व्यक्त करणं एव्हढ्यापुरता मर्यादित नाही. स्थानिक नगरसेवकाकडे महत्त्वाचे प्रश्न नेण्यापासून ते प्रसंगी शासननिर्णयाविरुद्ध आंदोलनात सहभागी होण्यापर्यंत आपल्या सर्वांना लोकशाहीत नियमित सामील व्हायला हवं.आजची आधुनिक संपर्क माध्यमं हे आपल्याला गवसलेलं नवं वाहन आहे. त्यातल्या प्रवासाचं थ्रिल आपण सारेच आत्ता अनुभवत आहोत.
वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here