म.टा.प्रतिनिधी, नगर: ‘युपीएचे अध्यक्ष यांनी व्हावे, असे शिवसेनेचे नेते यांनी म्हटले आहे. पण त्यासाठी संजय राऊत हे यूपीएचे कधी प्रवक्ते झाले, हे पाहण्याची आवश्यकता आहे,’ अशी खोचक टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केली. संजय राऊत यांनी आपलेच काय चालले आहे ते पाहावे, दुसऱ्याचे सांगण्याची आवश्यकता नाही,’ असा सल्लाही शिंदे यांनी यावेळी दिला.

नगरमध्ये आज, बुधवारी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी युपीए चे अध्यक्ष व्हावे , असे संजय राऊत यांनी म्हटल्याचे मला समजले. तर पी चिदंबरम यांनी सांगितले की पवार साहेब असे बोललेच नसतील. पवार साहेब यांनी सांगितले की बातम्यातून मला हे समजले. यावरून आता संजय राऊत यूपीएचे कधी प्रवक्ते झाले, हे पाहण्याची आवश्यकता आहे. मुळात शिवसेना यूपीएचा घटक नाही, व ते सांगतात युपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करा,’ असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

वाचाः

‘बिहारमध्ये शिवसेना निवडणूक लढली तेथे त्यांना दोन अंकी मते पडली नाहीत. गोव्यामध्ये पोस्टमार्टम करू म्हणाले, तिथे शिवसेना-राष्ट्रवादी चे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांनी आपले काय चालले आहे ते पाहावे, दुसऱ्याला सांगण्याची आवश्यकता नाही,’ असा सल्लाही शिंदे यांनी राऊत यांना दिला.

वाचाः

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस आल्यानंतर राज्यात चांगलेच राजकारण पेटले आहे. त्यावरही शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले , ‘ ईडीची चौकशी लागते तेव्हा त्यावरून राजकारण केले जाते, असे सातत्याने म्हटले जाते .परंतु कंगना राणावत संदर्भात ज्या वेळेस मुंबई महापालिकेने कारवाई केली, त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते की आम्ही मुंबई महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. आता तेच राऊत ईडी चौकशी लागल्यानंतर म्हणतात सूडबुद्धीने राजकारण केले. हे साफ खोटे व चुकीचे आहे. कारण ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ईडीच्या चौकशी मधून भाजपचे सुद्धा माणसे सुटली जात नाहीत. धुळ्याचे राजेंद्रकुमार गावित हे भाजपचे नेते आहेत. त्यांना व त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली आहे. त्यामुळे ईडी मध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाच विषय येत नाही. बेहिशोबी मालमत्ता बाळगणार्‍यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागते,’ असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here