अहमदनगर: ‘ यांचा आत्मा शेती आहे, असं म्हणतात. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र शेतीवर म्हणजेच त्यांच्या आत्म्यावरच चर्चा राज्यसभेत सुरू असताना पवार साहेब गैरहजर का राहिले असतील?,’ असा खोचक सवाल कृषि मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष यांनी केला. ‘शरद पवार हे प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्यांनी असे म्हटले की, कृषी विधेयक मांडण्याच्या सिस्टिमला विरोध आहे, विधेयकाला नाही. हे म्हणजे कही पे निगाहे, कही पे निशाना असेच आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ( questions )

वाचा:

नगरमध्ये आज, बुधवारी पाशा पटेल हे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून विरोधकांचा चांगला समाचार घेतला. ‘कृषी विधेयकावरून पंजाब, हरियाणा सोडला तर कुठेच भारतात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला नाही,’ असे सांगतानाच पटेल म्हणाले, ‘जेव्हा महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करतात, तेव्हा आठ दिवस रस्ते बंद असतात. पण कृषी विधेयक आल्यानंतर शेतकरी रस्त्यावर नाहीत, उलट शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. केवळ पंजाब, हरियाणा सोडला तर भारतात कुठेच शेतकऱ्यांचा उद्रेक झाला नाही. राहिला शरद पवार यांचा प्रश्न , तर आज जे कृषी विधेयक आले आहे त्याचा ड्राफ्ट हा शरद पवार हे कृषिमंत्री असतानाच तयार झाला होता. शरद पवारांचा आत्मा शेती म्हणतात, मला ते माहित नाही. पण शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, ते राज्यसभेचे सदस्य आहेत, मात्र आत्म्याची चर्चा राज्यसभेत सुरू असताना पवार साहेब गैरहजर का राहिले?’ असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला.

वाचा:

‘दिल्लीत ज्या आंदोलनाची सुरुवात झाली ती केवळ एमएसपी चा कायदा करा, या एकाच गोष्टीसाठी झाली होती,’ असे सांगत पटेल पुढे म्हणाले, ‘एमएसपी चा कायदा करा या मागणीसाठी पंजाब, हरियाणा शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली होती. तोपर्यंत या तीनही कृषी विधेयकाचे स्वागत जवळपास देशातील सर्व संघटनांनी केले आहे. भारतामध्ये शेतकऱ्यांना शेतीचे अर्थशास्त्र शिकवणारे शरद जोशी होते. हे शेतीचे अर्थशास्त्र सांगणाऱ्या शरद जोशी यांच्या सोबत काम केलेल्या माझ्यासारखे हजारो लोक आज देशात आहेत. त्या सर्वांनी फक्त राजू शेट्टी सोडून सर्वांनीच कृषी विधेयकाला पाठिंबा दिला. तर एमएसपी स्वतंत्र कायदा हवा, तेवढीच मागणी पंजाब व हरियाणा येथील शेतकरी दिल्लीला आले. सरकार त्या विषयावर जेव्हा चर्चा करण्यास तयार झाल्यावर, हेच आंदोलक म्हणतात तिन्ही कृषी विधेयक रद्द करा. एक मागणी मान्य करण्याऐवजी कृषी विधेयक रद्द करा, असे म्हणणे म्हणजेच आंदोलनात राजकारण सुरू झाले आहे. आंदोलनात शेती प्रश्नापासून भरकटलेली मंडळी आहेत. जर शेती प्रश्नावर हे आंदोलन टिकून राहिले असते, तर एकच राहली असती,’ असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here