म. टा. प्रतिनिधी, जळगावः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. पुण्याच्या भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणी त्यांना आज बुधवारी (दि.३०) मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यासाठी खडसे मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांनी तसे ईडी कार्यालयात कळविल्याने त्यांना चौकशीसाठी १४ दिवसांची मुदत दिली आहे. ईडी ने १४ दिवसात हजर होण्यास संमती दिल्याचे एकनाथ खडसे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

एकनाथ खडसे यांना पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यासाठी त्यांना आज बुधवारी (दि.३०) मुंबई येथिल ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच मुंबई येथे गेले होते. मात्र, एकनाथ खडसे यांना सोमवारी (दि.२८) ताप, सर्दी व कोरडा खोकला असा त्रास सौम्य प्रमाणात जाणवला. ही करोना सदृश्य लक्षणे असल्याचे त्यांना वैद्यकीय तज्ञांनी सांगीतले. तसेच यासाठी १४ दिवस विश्रांतीची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार एकनाथ खडसे यांनी ईडी कार्यलयात तसे कळविले त्या अनुशंगाने ईडी कार्यालयकडून त्यांना चौकशीसाठी १४ दिवसात हजर होण्यास संमती देण्यात आली असल्याचे एकनाथ खडसे यांनी एका पत्रकान्वये सांगीतले आहे.

तसेच प्रकृती बरी झाल्यानतंर ईडी कार्यालयास पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही खडसे यांनी पुढे नमूद केले आहे. एक महिन्यांपूर्वी खडसे यांना करोनाची लक्षणे जाणवल्याने मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानतंर त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला होता.

भोसरी भूखंडाप्रकरणी आहे चौकशी

एकनाथ खडसे यांना पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तीकर विभाग तसेच झोटिंग समितीने चौकशी केली होती. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here