मुंबईः करोना व्हायरसचं संकट राज्यावर अद्यापही आहे. यामुळं नागरिकांचे लक्ष करोनाची लस कधी येणार, याकडे लागलं आहे. महाराष्ट्रातील लस निर्माता सीरम इन्स्टिट्यूटनं लसनिर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. सीरम इन्स्टिट्युटचं हे योगदान लक्षात घेता राज्य सरकारने यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, अशी मागणी मनसेचे नेते यांनी केली आहे.

सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करुन देत आहेत. या करोनाच्या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करुन मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे हे कार्य महाराष्ट्र व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे. सायरस पुनावाला यांच्या या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या, अशी मागणी नांदगावकर यांनी सरकारकडे केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असून या कंपनीत पोलिओ, डायरिया आणि स्वाइन फ्यू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. १९६६ साली पुण्यात सायरस पुनावाला यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली.

दरम्यान, पुढील आठवड्यात सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हीशिल्ड’ लशीला वापराची परवानगी मिळेल, अशी ‘गुड न्यूज’ सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. जानेवारीत या लशीला परवानगी मिळाल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केल्याने आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here