नागपूर: रेल्वेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडून ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक कामगार आयुक्ताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या ( ) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. असे सहाय्यक आयुक्ताचे नाव आहे. मेसर्स कंपनीचे प्रकल्प अभियंते यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. ( Latest News Update )

वाचा:

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने बडनेरा येथे रेल्वे व्हॅगन सुधारण्याचे कंत्राट घेतले आहे. १३ डिसेंबरला विभागीय कामगार आयुक्त व सचिन शेलार यांनी बडनेरा येथील कार्यशाळेची पाहणी केली. या ठिकाणी श्रमिकांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना नसल्याचे दोन्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. दस्तऐवज घेऊन नागपुरातील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार १६ डिसेंबरला तक्रारदार सीजीओ कॉप्लेक्समधील कामगार आयुक्तांच्या कार्यालयात गेला व त्याने टी. के. सिंग यांची भेट घेतली. यावेळी शेलार यांना भेटा, असे सिंग हे तक्रारदाराला म्हणाले. तक्रारदार हा शेलार यांना भेटायला गेला. मात्र शेलार यांनी तक्रारदराला भेटण्याचे टाळले. त्यानंतर तक्रारदार तिथून निघून गेला. दरम्यान, सायंकाळी सिंग यांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर संपर्क साधून शेलार यांच्यासोबत बोला, असे सांगितले.

वाचा:

तक्रारदाराने शेलार यांच्याशी संपर्क साधला असता शेलार यांनी त्याला घरी भेटायला बोलावले. त्यावर तक्रारदाराला संशय आला व शेलार लाच मागणार असल्याची शंका त्याला आली. त्याने दोन दिवसांचा अवधी मागितला. तक्रारदाराने १८ डिसेंबरला सीबीआयकडे याबाबत तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची पडताळणी केली. याचदरम्यान शेलार यांनी तक्रारदाराकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली व मंगळवारी कार्यालयात भेटायला बोलाविले. तक्रारदार कार्यालयात येणार असल्याने अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआयच्या पथकाने कामगार आयुक्तालयात सापळा रचला व तक्रारदाराकडून लाच घेताच सीबीआयच्या पथकाने शेलार यांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध लाच लूचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे यासह वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेचाही तपास करण्यात येत असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here